Ad will apear here
Next
हिंदकॉन केमिकल्सच्या आयपीओला १३२ पट मागणी
पुणे : विविध रासायनिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सक्रिय असलेल्या हिंदकॉन केमिकल्स लिमिटेडच्या समभागाची नुकतीच एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाली. या समभाग विक्रीला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या समभागाची मागणी १३२ पट अधिक झाली.

नोंदणीनंतर लगेच हा शेअर वीस  टक्क्यांनी वधारला. प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) किंमत प्रतिशेअर २८ रुपये असताना हा शेअर ३३ रुपये ६० पैसे किंमतीला उघडला. ही समभाग विक्री गेल्या २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान झाली. त्याअंतर्गत दहा रुपये दर्शनी मूल्याचे २७ लाख ६० हजार समभाग प्रत्येकी २८ रुपये किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले.यातून ७ कोटी ७३ लाख रुपये भांडवल उभारणीची योजना असून ही रक्कम खेळत्या भांडवलाच्या गरजेची पूर्तता, तसेच सर्वसाधारण कंपनी खर्च व समभाग विक्रीच्या खर्चासाठी वापरली जाणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZTWBM
Similar Posts
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ २५ जुलैपासून खुला मुंबई : एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या प्रत्येकी पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन कोटी ५४ लाख ५७ हजार ५५५ समभागांची विक्री करण्यात येणार आहे. हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ८५ लाख ९२ हजार ९७०पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची आणि स्टँडर्ड लाइफ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडतर्फे
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडची समभाग विक्री मुंबई : ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने १६ मार्च २०१८ रोजी ‘प्रमोटर, भारताचे राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रालय, भारत सरकार’ यांच्यामार्फत, विक्री ऑफरच्या (ऑफर) माध्यमातून दर्शनी मूल्य दहा रुपये असलेले ३४,१०७,५२५ समभाग प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओच्या स्वरुपात खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language